देशमुखांच्या विरोधात वाझेला बनायचे माफीचा साक्षीदार! काय होणार देशमुखांचे?

135

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. कारण त्यांच्यावर आरोप असलेल्यामधील प्रमुख आरोपी सचिन वाझे हा यात माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला आहे. त्याने तसे पत्र ईडीला दिले आहे. जर याचा विचार ईडीने केला, तर देखमुखांवरील गुन्हा सिद्ध करणे सहज शक्य होऊन देशमुख यांना लालूप्रसाद यादव यांच्या प्रमाणे तुरूंगवास भोगावा लागेल.

वाझेचे देशमुखांवर एकामागोमाग एक आरोप 

सचिन वाझेच्या भूमिकेवर ईडी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी करणार आहे. त्यावेळी वाझे त्याचे म्हणणे मांडू शकणार आहे. तत्पूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना बुधवारी चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आला, तर एका प्रतिज्ञापत्रात वाझेने सांगितले की, त्याने अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच बारमधून खंडणीची वसुली केली. अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही वाझे याने म्हटले आहे. देशमुख यांनी आपल्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात जबरदस्ती वसूलीच्या खोट्या केसेस दाखल केल्या, असेही त्याने सांगितले.

(हेही वाचा हिजाब प्रकरणी आदित्य ठाकरेंचे मोठे विधान! म्हणाले…)

देशमुखांवर कुंटेंनीही केलेले आरोप 

या आधी पोलीस बदल्यांविषयी ईडीला दिलेल्या जबानीत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देशमुख आपल्याकडे पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या घेऊन येत असत, असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या शिवसेना नेते अनिल परब आपल्याला देत असत, असे म्हणून हात झटकले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.