भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या अस्थी गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी नाशिकला आणण्यात आल्या. रामकुंडावर धार्मिक विधी करुन त्यांचे विधीवत पध्दतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबीय रामकुंडावर उपस्थित होते. पुरोहित संघातर्फे अस्थी विसर्जनपूर्वी धार्मिक विधी पार पडल्या. यावेळी मंगेशकर परिवारासोबत शिवसेना नेते मिलींद नार्वेकर उपस्थित होते. नाशिक शिवसेनेकडून अस्थी विसर्जन कार्यक्रमाचे सर्व नियोजन करण्यात आले. लता दीदींनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दादर येथील छत्रपती शिवाय महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाशिक येथील रामकुंड येथे अस्थी विसर्जन#LataMangeshkar #LataDidi #RamkundNashik pic.twitter.com/MStwCrxTB6
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 10, 2022
अस्थी विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
आठ दशकांपर्यंत देशाच्या पाच पिढ्यांमध्ये सुरांचा गोडवा निर्माण करणाऱ्या, तो गोडवा कायम ठेवणाऱ्या भारतरत्न, स्वर गानसम्राज्ञी स्वर्गीय लता दीदी या रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी अनंतात विलीन झाल्या. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले होते. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले होते. आज पाचव्या दिवशी नाशिकच्या गोदावरी घाटावर असलेल्या पवित्र रामकुंडात लता मंगेशकर अर्थात दीदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. लता दीदींच्या अस्थी रामकुंड परिसरात त्यांचे कुटुंबीय घेऊन आले. विधिवत पूजा करूनही अस्थींचे विसर्जन रामकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मयुरेश पै, हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव कृष्ण मंगेशकर त्यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय व सेना नेते मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. दरम्यान, अस्थी विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(हेही वाचा लता मंगेशकर यांच्या नावे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट!)
Join Our WhatsApp Community