UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! ३३ सराव परीक्षा सत्रांचे आयोजन

113

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ जून, २०२२ रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर, विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या युपीएससी पूर्व सराव परीक्षेला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते मे २०२२ पर्यंत एकूण ३३ सराव परीक्षा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.

युपीएससी पूर्वपरीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) दिनांक ५ जून, २०२२ रोजी युपीएससीची पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन, महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत २०२१-२२ या प्रवेश वर्गातील विद्यार्थी व ठाणे शहरातील इच्छूक विद्यार्थ्यांसाठी दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते मे २०२२ पर्यंत एकूण ३३ सराव परीक्षा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सदर सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे तज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन करणेबाबतचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सराव परीक्षेला संस्थेतील व ठाणे शहरातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

( हेही वाचा : आदित्य ठाकरेंचे लक्ष उपनगराकडे: पदपथांपाठोपाठ बस स्टॉपही नवी ढंगात दिसणार )

विशेष सराव परीक्षा 

ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी व संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष सराव परीक्षा यशस्वीरीत्या होण्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. दरम्यान ठाणे शहर व लगतच्या परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना या विशेष सराव परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी संस्थेच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.