हिजाब तूर्तास घालू नका! उच्च न्यायालयाचा आदेश

135

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमधील मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून येण्यावर विरोध झाला आहे. हा वाद आता कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी आधी एकल पीठासमोर प्रकरण सुनावणीसाठी आले असता या पीठाने हे प्रकरण खंडपीठाकडे पाठवले त्याप्रमाणे खंडपीठाने यावर न्यायालय निकाल देईपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये, असा आदेश देत सुनावणी स्थगित केली आहे. मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती ज़े एम़ काझी आणि न्यायमूर्ती कृष्णा एस़ दीक्षित यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. ‘‘या प्रकरणावर आम्ही निकाल देऊ़  पण, न्यायालय निकाल देईपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट करत न्यायालयाने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचीही सूचना केली़.

१४ फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार 

‘न्यायालयाचा आदेश हा आपल्या याचिकाकर्त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करणारा ठरेल़  हा पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा अवमान ठरतो, असा युक्तिवाद कामत यांनी केला़ आहे. त्यावर ही सूचना फक्त काही दिवसांपुरती असून, त्यासाठी सहकार्य करावे, असे न्या़. अवस्थी म्हणाले. न्या. दीक्षित यांच्या एकल पीठाने बुधवारी हे प्रकरण व्यापक खंडपीठाकडे सोपविण्याच्या विचारार्थ मुख्य न्यायमूर्ती अवस्थी यांच्याकडे पाठवले होत़े  त्यानंतर न्या़. अवस्थी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्रिसदस्यीय पीठाची स्थापना केली़  आता या प्रकरणावर सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आह़े. कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद गेल्या डिसेंबरअखेरपासून सुरू झाला़. उडुपी जिल्ह्यातील एका सरकारी महाविद्यालयात हिजाब परिधान करून आलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेशास मनाई करण्यात आली़. हिजाबविरोधात हिंदूू विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली़. या वादाचे लोण अनेक शिक्षण संस्थांमध्ये पसरल्याने सरकारने मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता़.  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा १४ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला़.  त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यात येतील़  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शैक्षणिक संकुलातील परिस्थतीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला़.

(हेही वाचा शाळेत हिजाब परिधान करायचा का? उच्च न्यायालय काय सांगतंय? वाचा…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.