राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी, 14 फेब्रुवारीपासून मुंबईतील प्रमुख खंडपीठात प्रत्यक्ष सुनावण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 4 जानेवारी ते जानेवारी अखेरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्यक्ष सुनावण्या बंद केल्या आहेत. तसेच सुनावण्या व्हिडीओ कॉन्फेरंसीद्वारे घेण्यास सुरुवात झाली.
मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली घेतली बैठक
10 फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि त्यात इतर प्रशासकीय न्यायाधीश, राज्य आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि वकिलांच्या विविध बार असोसिएशनच्या सदस्यांचा समावेश होता. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव बैठकीला उपस्थित होते. 4 मार्चपर्यंत उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत काम करेल. त्यावेळी आधीच्या कोविड नियमानुसार सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
(हेही वाचा मुस्लिम संघटनांनी घेतली हिजाबवर बैठक! काय घेतला निर्णय?)
Join Our WhatsApp Community