मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी गुरुवारी, 10 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी पॉक्सो कायद्याबाबत दिलेले दोन निर्णय वादग्रस्त ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते निर्णय अवैध ठरवून मागे घेतले होते. या निर्णयामुळे गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला होता.
कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी राजीनामा
सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने त्यांची नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे कॉलेजियमने दुसऱ्यांदा त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय रद्द केला होता. या परिस्थितीत न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी राजीनामा दिला आहे. न्या. पुष्पा गनेडीवाला यांची 13 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यापूर्वी 2007 मध्ये त्यांची थेट मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर सत्र न्यायालय, नागपूर कौटुंबिक वाद कोर्ट, एमजेएच्या सहसंचालक, नागपूर सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, रजिस्ट्रार जनरल अशी विविध पदे भूषवली आहेत. न्या. गनेडीवाला यांचा कार्यकाळ 12 फेब्रुवारी रोजी संपणार होता, त्याच्या एक दिवस आधी त्यांनी राजीनामा दिला आहे.
(हेही वाचा उच्च न्यायालयात कधीपासून सुरू होणार प्रत्यक्ष सुनावणी? जाणून घ्या…)
Join Our WhatsApp Community