गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे गोव्यात आले होते, साखळी येथील प्रचार सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी चक्क महाराष्ट्रातून गोव्यात प्रचाराला गेलेल्या शिवसेना नेत्यांविषयी विलक्षण शंका उपस्थित केली आहे, त्यामुळे यावर गोव्यात वेगळीच चर्चा सुरू झाली.
भूमीपूत्र म्हणून गोवेकरांना प्राधान्य
साखळी मतदार संघात आयोजित प्रचार सभेत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मी गोव्यात प्रचाराला आलो, तेव्हा मला वेगळीच शंका वाटू लागली. महाराष्ट्रातून प्रचारासाठी गोव्याला आलेले सेना नेते हे पुन्हा महाराष्ट्रात परतणार का, अशी आपल्याला शंका येऊ लागली आहे, धाकधूक वाटत आहे. कारण आपले या राज्याशी नाते वेगळे आहे. आपले कुलदैवत या राज्यात आहे, असेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याची विशिष्ट ओळख असते. ज्या राज्यात जाऊ तेथील स्थानिक भूमीपूत्रांना न्याय देऊ, तसे स्थानिक गोवेकरांनाही प्राधान्य देऊ, हा सेनेचा गोवेकरांना शब्द आहे, असेही ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा चक्क रामदास आठवलेंनी शशी थरूरांची घेतली ‘शाळा’)
भाजपाने गोव्यासाठी काही केले नाही
महाराष्ट्र मॉडेल म्हणून चर्चेत आहे, कारण सलग २ वर्षे उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप फाइव्हमध्ये समावेश आहे. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. मागील १० वर्षे गोव्यात भाजपाची सत्ता आहे, वरती आणि खाली सरकार असूनही गोव्यासाठी काही केले नाही. गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहेत, बंगले आहेत, पण पाणी नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community