मुंबई महापालिकेत सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात येत असली तरी भविष्यात हे पद कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधून पदोन्नतीने भरण्यात यावे. अशाप्रकारे कमीत कमी दोन अतिरिक्त आयुक्तांची मुंबई महापालिकेत नेमणूक करण्यात यावी अशा प्रकारची सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे केली आहे. मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३च्या अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केल्यानंतर यावर आता अर्थसंकल्पीय चर्चेला समिती अध्यक्षांच्या भाषणाने सुरुवात झाली. या अर्थसंकल्पीय भाषणात बोलतांना यशवंत जाधव यांनी ही सूचना केली.
स्थायी समिती अध्यक्षांनी कोणती केली सूचना
यावेळी भाषणांत त्यांनी परेल एस.टी. स्टँड संमोर क्राऊन मिल परिसरात आरक्षणांतर्गत सुमारे ७०० चौरस मीटरचा भूखंड प्राप्त झाला आहे. या मैदानांत कबड्डी टर्फ उभारण्यात येत असून वरळी, प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी मिलच्या जागेतही आरक्षणांतर्गत एक लाख चौरस फुटांची जागा मिळणार आहे. त्या जागेतही अशाच प्रकारे प्रशस्त उद्यान उभारण्यात यावे अशी सूचना केली आहे. तसेच दादर चौपाटीवर व्ह्युइंग डेक उभारण्यात आली आहे. या गॅलरीच्या धर्तीवर मुंबईतील इतर ठिकाणी आऊटलेटवरही अशा गॅलऱ्या उभारण्यात याव्यात अशाप्रकारचीही सूचना आपल्या भाषणांत केली आहे.
रिक्त पदांवरील भरती प्रक्रियाही राबवावी
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन अशा अनेक अत्यावश्यक सेवा आहेत. तेथे कामगार-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. तर कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण, निधीची बचत करण्ण्यासाठी कामगार आणि कर्मचारी भरती रोखल्यास मुंबईतील नागरिकांच्या अत्यावश्यक सेवा देणे अशक्य होईल आणि सर्वांनाच जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागेल. आयुक्त कार्यालयांमध्ये आवश्यक तिथे कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांची तातडीने नियुक्ती करावी. तसेच स्थायी समितीच्या अखत्यारित महापालिका चिटणीस आणि मुख्य लेखापरिक्षक यांच्या कार्यालयातील रिक्त पदांवरील भरती प्रक्रियाही राबवावी अशीही सूचना त्यांनी केली.
(हेही वाचा – सोमय्यांवरील शिवसैनिकांचा हल्ला; 2 पोलिसांना भोवला)
उद्यानांमध्ये ग्लो गार्डन योजनेचा विचार करा
महापालिकेची उद्याने सायंकाळी ६ नंतर जनतेसाठी बंद केली जातात. या उद्यानातील झाडे, उद्यानामध्ये बसवण्यात आलेले खेळाचे साहित्य इत्यादींसाठी लाईट्सच्या वापर केला तर त्यांची शोभा वाढून या उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी पर्यटक येतील आणि त्यामुळे महापालिकेच्या महसूलात वाढ होईल. पण त्याबरोबरच रात्रीच्या वेळी उद्यानांमध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरी महापालिकेच्या मोठ्मोठ्या उद्यानांमध्ये ग्लो गार्डन योजना राबवण्यात यावी अशीही सूचना त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community