गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरूनच राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कर्नाटकातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इस्लाममध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत, जेव्हा महिलांनी हिजाब घालण्यास नकार दिला होता.
कुराणात हिजाबचा उल्लेख नाही
काही महाविद्यालये आणि शाळांमध्ये मुस्लिम महिलांना हिजाब घालण्यास बंदी असताना शिखांना पगडी घालण्याची परवानगी आहे, हा युक्तिवाद मूर्खपणाचा असल्याचे ते म्हणाले. राज्यपाल म्हणाले, “शीख धर्मात पगडी धर्मासाठी आवश्यक मानली जाते आणि स्वीकारली जाते. दुसरीकडे महिलांच्या पोशाखाच्या संदर्भात कुराणात हिजाबचा उल्लेख नाही.”
मुस्लिम विद्यार्थिनींना दिला हा सल्ला
मुस्लिम विद्यार्थिनींना निहित स्वार्थासाठी हिजाब घालण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप राज्यपाल यांनी केला. ते म्हणाले की, त्यांना स्वार्थासाठी मुस्लिम महिलांना जुन्या काळात ढकलायचे आहे. अशा लोकांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला. हिजाब हा इस्लामचा अंगभूत भाग नाही, असेही ते म्हणाले. 1986 मध्ये सरकार कट्टरवाद्यांच्या दबावाला बळी पडले, पण हे सरकार दबावापुढे झुकणार नाही.
(हेही वाचा – शेलार म्हणाले, “… आणि महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण झालं”)
काय आहे हिजाबचा वाद?
कर्नाटक सरकारने कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चा कलम 133 राज्यात लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान केला जाईल,तर खासगी शाळांनाही स्वतःचा गणवेश निवडता येणार आहे.
Join Our WhatsApp Community