#IPL2022Auction: आयपीएलच्या लिलावात धक्कादायक प्रकार! लिलाव थांबवला

158

आयपीएल-२०२२ च्या १५व्या मोसमाचा लिलाव शनिवारी बंगळूरु येथे पार पडत आहे. हा लिलाव पार पडत असताना अचानक एक धक्कादायक प्रकार घडला. लिलावाचे सादरकर्ते ह्यूज एडमिड्स यांना लिलावादरम्यान अचानक भोवळ येऊन ते खाली कोसळले. यामुळे तिथे एकच खळबळ उडाली आहे.

ह्यूज यांना रुग्णालयात केले दाखल

सध्या ह्यूज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक त्यांची तब्येत बिघडण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या प्रकारामुळे सध्या आयपीएलचे लिलाव सत्र काही काळासाठी थांबवण्यात आले आहे.

कोण आहेत ह्यूज एडमिड्स?

ह्यूज एडमिड्स हे ब्रिटनचे असून ते जगातील नावाजलेले लिलावकर्ते आहेत. ते २०१९ पासून आयपीएल सत्रांचे ते लिलालवकर्ते आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आयपीएलचे लिलावकर्ते रिचर्ड मॅडली यांची जागा घेतली होती. त्यांच्या तब्येतीबाबत लवकरच वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.