बंगळूर येथे शनिवार पासून आयपीएलच्या 15व्या मोसमासाठी लिलाव सत्र सुरू झाले आहे. दरवर्षी प्रमाणे या मोसमातही अनेक खेळाडूंसाठी बोली लागत आहे. यामध्ये अनेक खेळाडू मालामाल होताना दिसत आहेत. यामध्ये लिलावाच्या पहिल्या दिवशी भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. यामुळेच आतापर्यंतच्या आयपीएल लिलावातील सर्वाधिक महागड्या खेळाडूंच्या यादीत ईशान किशनने दुसरे स्थान पटकावले आहे.
सर्वाधिक महागड्या खेळाडूंच्या यादीत
ईशान किशन या भारताच्या डावखु-या आणि धडाकेबाज फलंदाजासाठी मुंबई आणि हैद्राबाद या दोन संघांमध्ये लिलावादरम्यान चढाओढ सुरू होती. पण अखेर मुंबईने 15.25 करोड रुपयांची बोली लावत त्याला विकत घेतले. आतापर्यंत आयपीएलच्या सर्व मोसमांमध्ये मुंबई इंडियन्सने लावलेली ही सर्वाधिक बोली असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत मुंबईने आयपीएलच्या इतिहासात 10 कोटींपेक्षा जास्त कोणावरही बोली लावली नव्हती.
या खेळाडूंवरही लागली जास्त बोली
यामुळे ईशान किशन हा युवराज सिंह नंतर आयपीएल मधला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याआधी आयपीएलच्या एका मोसमात युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लावण्यात आली होती. तर ईशानच्या पाठोपाठ 12.25 कोटींची बोली लागलेला श्रेयस अय्यर हा आजच्या दिवसातील दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणा-या प्रसिद्ध क्रिष्णनला राजस्थानने 10 कोटी देऊन आपल्या संघात घेतले आहे.
कोण आहे कुठल्या संघात?
1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी), डिपक चहर
2) मुंबई इंडियन्स- ईशान किशन (15.25 कोटी)
3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50 कोटी), शार्दुल ठाकूर (10 कोटी)
4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी),
5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी),
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी),
7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75)
8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेण्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी), प्रसिद्ध क्रिष्णन(10 कोटी), युझवेंद्र चहल(6.50 कोटी)
9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी). जॉनी बेयरेस्टो (6.75),
10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी)
अनसोल्ड- डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब उल हसन, मोहम्मद नबी, मेथ्यू वेड, वृद्धमान साहा, सॅम बिलिंग्स,