‘त्या’ बँक व्यवस्थापकाच्या हत्येमागचे धक्कादायक कारण आले समोर

याप्रकरणी दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

124

‘सिडबी’ बँक सहाय्यक व्यवस्थापक संतन शेषाद्री यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्नी आणि मुलाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतन शेषाद्री हे पत्नी आणि मुलाला पुनर्वसन सेंटर (रिहॅब सेंटर ) मध्ये पाठवत होते, हे दोघे मानसिक रुग्ण असल्याचे संतन याने रिहॅब सेंटरमध्ये सांगितल्यामुळे या दोघांवर त्या ठिकाणी शॉक ट्रीटमेंट दिली जात होती. माझ्याकडे पुन्हा पैसे मागितल्यास तुमची रवानगी पुन्हा रिहॅब सेंटरला करण्यात येईल, अशी धमकी संतन हा पत्नी आणि मुलाला देत होता. पतीच्या या कृत्याला कंटाळल्यामुळे या दोघांनी संतनची हत्या केल्याची कबुली पत्नीने पोलिसांना दिली आहे.

जयशीला (५३) आणि अरविंद (२६) असे अटक करण्यात आलेल्या पत्नी आणि मुलाचे नाव आहे. या दोघांनी शुक्रवारी संतन शेषाद्री (५५) यांची घरात हत्या करून मृतदेह ७व्या मजल्यावरील गॅलरीतून खाली फेकून आत्महत्येचा बनाव केला होता. याप्रकरणी दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचाः प्रात:विधीला निघालेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या)

हत्येची दिली कबुली

अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई मार्ग येथील सिडबी बँक कॉटर्स मध्ये हे कुटुंब राहत होते. संतन शेषाद्री हे सीडबी बँकेचे सहायक व्यवस्थापक या पदावर होते. शुक्रवारी पहाटे त्याचा मृतदेह इमारतीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पत्नीने हाताची नस कापून गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नी आणि मुलाने केला होता. आंबोली पोलिसांनी याप्रकरणी तपास करून पत्नी आणि मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली.

पतीचा होत होता त्रास

शनिवारी दोघांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. हत्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली. संतन हे घरखर्चासाठी तसेच मुलाला शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी पैसे देत नव्हते. त्यातच २०१८ मध्ये पती संतन याने आम्ही दोघे मानसिक रुग्ण असल्याचे सांगून आम्हाला दोघांना कोइम्बतूर येथील एका रिहॅब सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याठिकाणी आमच्यावर शॉक ट्रीटमेंट करण्यात येत होती. या ट्रीटमेंट मुले आम्हाला खूप त्रास होत होता.

(हेही वाचाः बँक व्यवस्थापकाची हत्या! पत्नी आणि मुलाला अटक, कारण ऐकून बसेल धक्का)

असा रचला हत्येचा कट

२०२१ मध्ये मुंबईच्या एका खाजगी रिहॅब सेंटरमध्ये दाखल केले होते. रिहॅब सेंटरमध्ये आम्ही खूप त्रासलो होतो, त्यातच पती संतन यांच्याकडे आम्ही खर्चासाठी पैसे मागितले अथवा इतर कामासाठी पैसे मागितले असता, ते आम्हला रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्याची धमकी देत होते. त्याच्या या धमकीला कंटाळून अखेर आम्ही त्याची हत्या करण्याचा कट रचला आणि शुक्रवारी पहाटे झोपेत असताना त्यांची हत्या करून मृतदेह ७व्या मजल्यावरून खाली फेकला, अशी माहिती पत्नी जयशीला हिने पोलिसांना दिली. जयशीला हिने दिलेली माहिती खरी आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांचे एक पथक कोइंबतूर आणि मुंबईतील रिहॅब सेंटरमध्ये चौकशी करून त्याची माहिती मिळवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.