जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा, आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या भ्रष्टाचारात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. यावर आता प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचा समाचार घेत, काही लोकांना भुंकण्याची सवय असते, जेवढं भुंकायचं आहे तेवढं भुंका. शिवसेना मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. तेव्हा करारा जवाब मिळेल, असं राऊतांनी म्हटलं. त्यामुळे आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमच्या फायली तयार
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला नाही, असं स्पष्ट केलं आहे, पण तरीही काही जण भुंकत असतील, तर भुंकू द्या. कोविडला काही लोक घाबरत होते अशा वेळी काही संस्था आणि लोक पुढे आले. त्यांनी कोविड सेंटर चालवले. त्यावेळी भाजपचे लोकं नव्हते. भाजपचे लोक घाबरत होते. राजकारण नंतर समाजकारण आधी, हा आमचा वसा आहे. त्यानुसार आम्ही काम केलं. तुमच्याही फायली आमच्याकडे तयार आहेत, तेव्हा कळेल फायली काय असतात. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या पोटात दुखत, असेल तर पोटावर उपचार करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
त्याआधी फायली दाखवा
येत्या मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल. ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. माझी नसेल. त्या आधी काय फायली दाखवायच्या त्या दाखवा, नंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेऊ, असंही राऊत यांनी सांगितलं.
( हेही वाचा: २००९ च्या निवडणुकीसाठी यूपीएने मालेगाव बाँबस्फोटाचा तपास भरकटवला? )
…तर जनता लक्ष देत नाही
कोविडच्या काळात केलेल्या कामाचं मुंबई आणि महाराष्ट्राचं कोर्टाने आणि सर्व जगाने कौतुक केलं. त्याची वेदना त्यांना आहे. आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. कुणाला एफआयआर दाखल करायची असेल, तर काशी आणि वाराणसीत जाऊन करावी. तिथे जाऊन सेंट्रल एजन्सीकडून चौकशीची मागणी करावी. कुणी भुकंत असेल, तर येथील राज्यातील जनता लक्ष देत नाही, असंही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community