कोळसा खाणींचा लिलाव कशा पद्धतीने केला? जाणून घ्या…

113

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने सीएमएसपी अर्थात कोळसा खनन (विशेष तरतूद) कायद्याअंतर्गत 13 व्या भागाच्या आणि एमएमडीआर अर्थात खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्याच्या तिसऱ्या भागाअंतर्गत व्यावसायिक उत्खननासाठी कोळसा खाणींचे लिलाव सुरु केले. ई-लिलाव पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत एकूण 10 कोळसा खाणींसाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी 6 कोळसा खाणी सीएमएसपी खाणी आहेत, तर उर्वरित एमएमडीआर खाणी आहेत.

या सर्व कोळसा खाणींचा तपशील :-

  • नऊ कोळसा खाणी पूर्णपणे संशोधित करण्यात आल्या आहेत तर एक खाण अंशतः संशोधित केली आहे;
  •  या सर्व खाणींमध्ये एकूण 1716.211 दशलक्ष टन भूगर्भीय कोळसा साठा आहे.
  •  या कोळसा खाणींची एकंदर पीआरसी 22.014 दशलक्ष टन प्रती वर्ष आहे.

( हेही वाचा: तुम्ही कर चुकवताय, तर ‘या’ मोहिमेअंतर्गत होईल कारवाई! )

लिलाव यशस्वीरित्या पूर्ण

या लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्रातील माजरा येथील कोळसा खाणीचा समावेश आहे. या ठिकाणी 31.036 दशलक्ष टन भूगर्भीय कोळशाचे साठे आहेत. या उत्खननासाठी 72 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करावी लागणार असून, त्यातून 76.26 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळणार आहे. व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील वर उल्लेखित 10 कोळसा खाणींच्या लिलावासह एकूण 42 कोळसा खाणींचे लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत आणि त्यांची पीआरसी प्रती वर्ष 86.404 दशलक्ष टन इतकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.