कर्नाटकात हिजाब विषयाचा वाद वाढत आहे, त्याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणांचा एक गट बुरखा घातलेल्या महिलांवर गटारातील पाणी बादल्या भरून फेकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही मुले अतिरेकी विचारांचे हिंदू पुरुष होते, असे या व्हिडिओमधून सांगण्यात येत होते. गेल्या १५ दिवसांपासून कर्नाटकात तसेच आता देशभर हिजाबचं विरोध होऊ लागला आहे. अशा वातावरणात हा व्हिडिओ समाजात तेढ निर्माण करणारा ठरत होता.
व्हिडिओ 2019 मध्ये श्रीलंकेत शूट करण्यात आला होता
It’s called most secular country India throwing gutter water on Muslim women wearing Hijab.😢😢 pic.twitter.com/18UavXL4mM
— abdul qudoos (@abdulqu42571597) February 11, 2022
काहींनी हे तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असल्याचा दावा केला आहे. इंडिया टुडे अँटी फेक न्यूज वॉर रूमने या व्हिडिओची सत्यता पडताळली. त्यामध्ये हा व्हिडिओ भारतातील नाही. हा श्रीलंकेचा जुना व्हिडिओ आहे, असे दिसून आले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी दावा केला होता की व्हिडिओमध्ये श्रीलंकेतील इस्टर्न युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी ज्युनियर्सना त्रास देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 2019 मध्ये श्रीलंकेत शूट करण्यात आला होता आणि त्यात ईस्टर्न युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करताना दाखवले होते.
(हेही वाचा बुरखा, हिजाब ब्रेन वॉशिंगचा परिणाम!)
Join Our WhatsApp Community