सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सत्ताधारी पक्षातील नेते तसेच, विरोधी पक्षातील काही दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. हे नेते मिळून मंच गाजवणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात कोणतं राजकीय नाट्य रंगणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
‘या’ नेत्यांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (ता.१४) पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे, मंत्री छगन भुजबळ, तसेच, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
( हेही वाचा: वाईनसंबंधी निर्णयाविरोधात अण्णांचे उपोषण मागे! कारण काय? )
…म्हणून उद्घाटन करता आले नाही
विद्यापीठातील मुख्य इमारती समोर सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याचे काम आता पूर्ण झाले असून, परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच सावित्रीबाईंच्या जन्मदिनी ३ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याची योजना होती. मात्र, राज्यपालांची वेळ घेण्यासाठी उशीर झाल्याने, उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत, जयंती दिनीच उद्घाटन करण्याची मागणी लावून धरली होती.
Join Our WhatsApp Community