बेस्ट उपक्रमाकडून आता आणखी एक सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेनुसार एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास करता येणार आहे. सुलभ प्रवासासाठी बेस्टकडून ही सुविधा देण्यात आली आहे. ‘नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड’ फेब्रुवारीच्या अखेरपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कुठेही करु शकता प्रवास
बेस्ट उपक्रमाने 2020 च्या ऑक्टोबरपासून सामायिक कार्डच्या चाचणीला सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या कार्डद्वारे प्रवाशाला तिकिटाचे पैसे द्यावे लागतील. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असणे गरजेचे आहे. या कार्डमध्ये रिचार्ज करता येणार आहे. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांमध्ये सामायिक कार्डची सुविधा आहे, तिथे बेस्टच्या कार्डचाही वापर करता येणार आहे.
( हेही वाचा: #Blackday व्हॅलेंटाईन डे नको, तर पुलवामा हल्ल्याचं स्मरण करा! ट्विटर ट्रेंड)
कार्डचा असाही वापर
या कार्डसाठी एका बॅंकेसोबत करार केला जाणार आहे. वाहतुकीत तिकीट काढण्याबरोबरच डेबिट कार्डप्रमाणे या कार्डचा वापर करता येईल. या कार्डद्वारे वीजबिलही भरता येणार आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे, यासाठी एमएमआरडीएकडून एकात्मिक तिकीट प्रणालीची योजना काही वर्षांपूर्वी आखण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community