व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी नेटकरी का म्हणतायत #Blackday ?

190

आज 14 फेब्रुवारी दिनी जगभरातील लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात व्यस्त असताना, भारतातील लोक व्हॅलेंटाईन डे ऐवजी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीर जवानांचे स्मरण करत आहेत. आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असून, हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणं आपलं कर्तव्य आहे, असं म्हणत भारतातील नागरिकांनी आपल्या जवानांप्रती आपलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. त्यासाठी ट्विटरवर ट्रेंड सुरु करण्यात आला आहे,  आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असल्याचं, नेटक-यांकडून म्हटलं जात आहे. .

या ट्रेंडमधील काही ट्विट

एका नेटक-याने ट्विट करत म्हटलंय की, मी त्या सर्व भारतीयांचा निषेध करतो, जे पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना विसरतात, पण व्हॅलेंटाईन डे आठवणीने साजरा करतात.  भारतीय असल्याच्या नात्याने आपण हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे.

https://twitter.com/bhartipuja995/status/1492887433008250881?s=20&t=PMK6VoxTpPRZFRtH2nfP2Q

कुमार नीरज या नेटक-याने आजच्या दिवशी आपण आपल्या 40 बहादूर जवानांना गमावलं. हा देशातील एक काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

रिदानशि नावाच्या नेटक-याने म्हटलयं की मी व्हॅलेंटाईन डे साठी उत्सुक नाही,याच कारण मी एकटा आहे असं नाही, तर  तर पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे.

मनिषा राय नावाच्या ट्विटर युजरने या काळ्या दिवसाच्या आठवणीत लिहिलयं की, आम्ही हा दिवस विसरणार तर नाहीच पण माफही करणार नाही. भारतातील वीर जवानांना सल्युट असं म्हणत तिने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

( हेही वाचा: ‘या’ देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही! ‘रोमन कॅथलिक चर्च’नेही व्हॅलेंटाईनचे नाव यादीतून वगळले)

असा झाला पुलवामा हमला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2 हजार 500 जवानांना घेऊन, सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला होता, तेव्हा रस्त्याच्या पलीकडून येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. समोरून येणारी एसयूव्ही जवानांच्या ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला. या प्राणघातक हल्ल्यात 40 शूर सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.