मुंबईकरांच्या निरोगी फुफ्फुसासाठी पालिकेचे फुफ्फुस पुनर्वसन केंद्र… पाहा कुठे उपलब्ध आहे?

139

मुंबईकरांना कोरोनावरील मोफत उपचारापाठोपाठ फुफ्फुसाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक व्यायाम शिकवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयापाठोपाठ आता कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातही सोमवारपासून फुफ्फुस पुनर्वसन केंद्र सुरु होईल. कोविड उपचारांतून बरे झालेले रुग्ण, क्षयरोग, दमा तसेच श्वसनासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना फुफ्फुसाशी संबंधित व्यायम या केंद्रात शिकवले जातील. रविवारी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयांचे महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

फुफ्फुसाचे उपचार केंद्र

कोरोनावरील उपचारानंतरही फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा नको म्हणून, रुग्णांना फुफ्फुसांच्या आवश्यक व्यायामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. ही रुग्णांची मुंबईत लक्षणीय संख्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिली. अगोदरच मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असताना, मुंबईतील बहुतांश रुग्णांना आता श्वसनासंबंधी आजार दिसून येत आहेत. या रुग्णांसाठीही फुफ्फुसाचे उपचार या केंद्रात तीन महिन्यांच्या काळात फिजिओथेअरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिकवले जाणार आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रात तसेच रुग्णालयांतून या केंद्रात रुग्ण फुफ्फुसांच्या व्यायामासाठी पाठवले जातील.

केंद्र उभारण्यात आलं

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम तसेच सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून शिवडीतील क्षयरोग रुग्णालय आणि कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील फुफ्फुस पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले. यातील साधनसामग्री सिप्ला फाऊंडेशच्यावतीने दिली गेली. यात वॉकर, दोन वेगळ्या प्रकारच्या सायकल, कमी वजनाच्या व्यायामाची साधने आदी प्रकार प्रत्येक केंद्रात उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रात सध्या एक फिजिओथेरपिस्ट, एक परिचारिका आणि एक अटेंडण्ड आहेत. या दोन्ही केंद्रात अजून एक फिजिओथेअरपिस्टची भरती प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती मुंबई शहर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर  प्रणिता टिपरे यांनी  सांगितले.

( हेही वाचा :धक्कादायक! पाकिस्तानमधून समुद्रमार्गे ड्रग्स तस्करी पकडली! कुणी केली कारवाई? )

का वाढताहेत श्वसनाचे रुग्ण

ढासळलेल्या हवेची गुणवत्ता हा मुंबई शहरासाठी चिंताजनक विषय आहे. त्यामुळे हिवाळ्यात हवेची गुणवत्ता ढासळल्यास, हमखास श्वसनाच्या तक्रारींसह रुग्णांची गर्दी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दिसून येते. दमेकरी रुग्णांना औषधोपचारांसह व्यायामाचाही सल्ला दिला जातो. तसेच क्षयरोगाच्याही रुग्णांच्या फुफ्फुसाचे कार्य सुरळीत राहावे, म्हणून व्यायामाचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. गेल्या वर्षी मुंबईत ५८ हजारांहून अधिक क्षयरोगाचे रग्ण आढळले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.