कोणत्या ५४ चिनी अ‍ॅप्सवर भारत सरकारने घातली बंदी? जाणून घ्या..

138

भारत सरकारने पुन्हा एकदा चीनला मोठा दणका दिलेला आहे. सरकारने तब्बल ५४ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे,  अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे.

( हेही वाचा : ‘या’ देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही! ‘रोमन कॅथलिक चर्च’नेही व्हॅलेंटाईनचे नाव यादीतून वगळले )

हे अ‍ॅप्स भारतीयांचा संवेदनशील डेटा चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. तसेच या अ‍ॅप्समुळे भारतीयांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. म्हणूनच आयटी मंत्रालयाने हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून सुद्धा ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम 69A अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.

बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्स

बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये ब्युटी कॅमेरा: स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा – सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स एन्ट, आयसोलँड 2: अ‍ॅशेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ओन्म्योजी चेस, ओनम्योजी एरिना, अ‍ॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट या विविध अ‍ॅप्सचा समावेश आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने २९ जून २०२० रोजी ५९ अ‍ॅप्स त्यानंतर सरकारकडून १० ऑगस्ट २०२० रोजी ४७ क्लोनिंग अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. तर १ सप्टेंबर २०२० रोजी ११८ अ‍ॅप्स आणि १९ नोव्हेंबरला आणखी ४३ अ‍ॅप्स केंद्र सरकारकडून ब्लॉक करण्यात आले होते. हे ५४ अ‍ॅप्स युजर्सकडून विविध अ‍ॅक्सेस घेतात आणि वापरकर्त्यांचा संवेदनशील डेटा गोळा करतात. या संकलित केलेल्या रिअल-टाइम डेटाचा गैरवापर केला जात आहे. असे आयटी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.