देशात कोरोनाचा प्रसार होण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संसदेत केले. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन सुरू केले.
पण नंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोलेंसारख्या नौटंकीबाज नेत्यांनी आंदोलन करुन काहीही परिणाम होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पटोलेंचा खरपूस समाचार घेतला.
(हेही वाचाः काँग्रेसच्या ‘सागर’ आंदोलनाचा का झाला फियास्को? जाणून घ्या…)
काय म्हणाले फडणवीस?
काँग्रेसने आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार टीका केली. आपण सगळे असताना कोणाचीही निदर्शनं करण्याची हिंमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. नाना पटोले हे नौटंकीबाज नेते आहेत. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी त्याचा काहीही परिणाम नाही, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
भाजप नेत्यांची गुंडगिरी समोर आली
नाना पटोले यांच्या नेतृत्वात कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी आंदोलन सुरू केले. त्यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याचा त्रास मुंबईकरांना झाल्याने नाना पटोले यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. पण मुंबईकरांच्या या गैरसोयीसाठी भाजप नेते जबाबदार आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची गुंडगिरी आज समोर आली आहे, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
(हेही वाचाः IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने घेतले आणि ट्रॉल्सने झोडले!)
पटोलेंनी आरशात तोंड बघावं
काँग्रेसने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांच्यासह इतरही भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पटोलेंवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील कोट्यवधी जनतेचे आशिर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याची धमकी देणारे नाना पटोले फार किरकोळ आहेत. त्यांनी असल्या फुसक्या धमक्या देण्याआधी रोज उठून आरशात तोंड बघावं, अशा शब्दांत त्यांनी भाजपने ट्विटरवरुन टीका केली आहे.
Join Our WhatsApp Communityराज्यातील कोट्यवधी जनतेचे आशिर्वाद ज्यांच्या पाठीशी आहेत असे, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व @Dev_Fadnavis जी यांच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याची धमकी देणारे @NANA_PATOLE फार किरकोळ आहेत.
नाना पटोलेंनी रोज उठुन आरशात तोंड बघावं, असल्या फुसक्या धमक्या देण्याआधी. pic.twitter.com/rJ0yElnux8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 14, 2022