‘मिस इंडिया’ होण्याचे तुमचे स्वप्न ‘असे’ करा साकार!

190

#MissIndiaAuditions2022 हा हॅशटॅग सध्या ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. मिस इंडिया ही आपल्या भारतातील प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा आहे. आजवर कित्येक मुलींनी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहिले आहे. परंतु योग्य प्रक्रिया माहित नसल्यामुळे अनेक मुली निराश होतात. अशा सर्व मुलींना आता दिलासा मिळाला आहे. १४ ते १५ मार्चपर्यंत तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवू शकता.

( हेही वाचा : पाश्चिमात्य Day’s कापतात भारतीयांचे खिसे! )

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया, नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.

१. ४ छायाचित्रे : मेकअप न केलेले क्लोज, फुल साईज, नैसर्गिक फोटो, Mid Length फोटो असावेत.

२. वय : १८ ते २५ वर्ष ( वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण)

३. उंची : ५ फूट ३ इंच आणि अधिक

४. रिलेशनशीप स्टेटस : अवैवाहिक

( हेही वाचा : आता वसई-मुंबई दरम्यानचे अंतर होणार कमी! किती वेळात पोहोचता येणार? )

५. Moj अॅप डाउनलोड करा. तुमच्या वैयक्तिक Moj हँडलवर 3 स्वतंत्र ऑडिशन टास्क व्हिडिओ अपलोड करा. परिचय व्हिडिओ, रॅम्पवॉक व्हिडिओ आणि टॅलेंट शोकेस व्हिडिओंचा यामध्ये समावेश असेल. उभा फोन/कॅमेरा अँगलने व्हिडिओ शूट करा. प्रत्येक व्हिडिओची मर्यादा फक्त ६० सेकंद आहे. आवश्यक असल्यास, अॅपवर उपलब्ध Moj Music Library मधील संगीत वापरा. तुमच्या प्रत्येक कॅप्शनमध्ये #MissIndiaAuditions2022 हा हॅशटॅग टाकणे अनिवार्य आहे. तिन्ही व्हिडिओंमध्ये फिल्टर वापरण्यास सक्त मनाई आहे.

६. तुमच्या Moj हँडलसह 3 व्हिडिओंच्या URL कॉपी करा आणि या लिंक तुम्हाला मिस इंडिया वेबसाइटवर नोंदणी केलेल्या फॉर्ममध्ये पेस्ट कराव्या लागतील.

७. अधिक माहितीसाठी, सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. संपर्क: +91 9619937295 / +91 9930771844 किंवा [email protected] या लिंकला भेट द्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.