सोमवारी राज्यात कोरोनाचे इतके रुग्ण!

123

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारच्या नव्या नोंदीनुसार कोरोनाच्या तिस-या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

अशी आहे संख्या

फेब्रुवारीच्या पंधरवड्यापर्यंत तिसरी लाट संपत येणार असल्याचा आरोग्य विभागाचे पूर्वानुमान अखेर खरे ठरताना दिसत आहे. सोमवारी दिवस अखेर राज्यभरात ३६ हजार ४४७ कोरोनाचे रुग्ण असल्याचे समजत आहे. तर सोमवारी केवळ १ हजार ९६६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः तीन राज्यांच्या निवडणुकीत मतदारांचा अल्प प्रतिसाद! इतके झाले मतदान)

ओमायक्रॉनचा प्रभाव कमी

ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोनाच्या तिस-या लाटेचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी आगमन झाले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली होती. परंतु ओमायक्रॉन विषाणू दुस-या लाटेत प्रभावी ठरलेल्या डेल्टा विषाणूएवढा जीवघेणा ठरला नाही. कर्करोग तसेच श्वसनासंबंधी विकार असलेल्या रुग्णांना ओमायक्रॉनवरील उपचार आव्हानात्मक ठरत असल्याची नोंद डॉक्टरांनी केली.

रुग्ण बरे होण्याचा दर वाढला

ही लाट आता अखेरच्या टप्प्यात असतानाच सोमवारी केवळ १ हजार ९६६ रुग्णांची नवी नोंद झाली. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या ११ हजार ४०८ पर्यंत आढळून आली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

(हेही वाचाः गावक-यांका सीमेवरचो देव पावलो…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.