भारतात आतापर्यंत लसीकरण मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरात लवकर सर्व नागरिकांना लसवंत करुन देशातून कोरोनाला हद्दपार करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. त्यामुळेच 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू केल्यानंतर आता 12 वर्षांवरील मुलांसाठी सुद्धा लवकरच लस उपलब्ध होणार आहे.
बायोलॉजिकल-ई कंपनीच्या Corbevax लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियामक प्रशासनाची (DCGI) तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यास 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
(हेही वाचाः सोमवारी राज्यात कोरोनाचे इतके रुग्ण!)
Drugs Controller General of India's (DCGI) Subject Expert Committee (SEC) recommended granting restricted emergency use authorisation to Biological E's COVID-19 vaccine, Corbevax, for age group 12 to 18 years subject to certain conditions, official sources said. pic.twitter.com/EeFC6h5Cpg
— ANI (@ANI) February 14, 2022
90 टक्के प्रभावी लस
हैद्राबादच्या बायोलॉजिकल-ई या कंपनीने Corbevax लसीची निर्मिती केली असून, ही लस कोविडविरुद्ध 90 टक्के प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाविरोधात भारतात तयार झालेली ही आरबीडी प्रोटीन सब-युनिटवर आधारीत लस आहे. दरम्यान बायोलॉजिकल-ई ने अलीकडेच लसीच्या 5-12 वर्षे आणि 12-18 वर्षे वयोगटासाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल कोवोवॅक्स (COVOVAX) लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.
(हेही वाचाः तीन राज्यांच्या निवडणुकीत मतदारांचा अल्प प्रतिसाद! इतके झाले मतदान)
सर्वात स्वस्त लस
Corbevax ही लस आतापर्यंत भारतात मान्यता मिळालेल्या सर्व लसींपेक्षा सर्वात स्वस्त अशी लस असणार आहे. इत लसींप्रमाणेच या लसीचेही दोन डोस घेणे आवश्यक आहे. ही लस बाजारात 250 रुपयांपर्यंत उपलब्ध करुन दिली जाईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. लसीपासून नफा मिळवणे हे लक्ष्य नसून, लोकांची सेवा करणे हा आमचा हेतू आहे. त्यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले असल्याची माहिती बायोलॉजिकल-ई च्या वतीने देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community