शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, धक्कादायक माहिती आली समोर!

118

दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी साईबाबांच्या शिर्डीत रेकी केल्याची धक्कादायक कबूली दिली आहे. दुबईमधील या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांकडून शिर्डीची रेकी केली गेल्याने, एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीतील लाखो भाविकांवर या दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.

संपादकांच्या घरी केली रेकी

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसने म्हटलं आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने, याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

( हेही वाचा: मंत्र्यांनाच पडला उद्धव ठाकरेंच्या नावाचा ‘विसर’! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे घेतले नाव )

अतिरेकी अटकेत

दुबई येथील अटक केलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी या अतिरेक्यांनी ही रेकी केली होती. या अतिरेक्यांचे पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचं, गुजरात एटीएसनं म्हटलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा मौलवींसह दोन अतिरेकी अशा आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.