एअर इंडिया आपल्या ग्राहकांना नेहमी चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र या एअर इंडियाचा ताबा टाटांनी घेतल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. एअर इंडिया टाटांच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर तिला पूर्वस्वरूप प्राप्त करून देण्यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न सुरू केले आहे. या अंतर्गत प्रवासी सेवेत सुधारणा करण्यासाठी एअर एशियासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार विमान फेरीस विलंब झाला, ती रद्द करावी लागली अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांना तत्काळ दुसऱ्या विमानातून प्रवास करता येणार आहे.
एअर इंडियाचं तिकीट दुसऱ्या विमानातही चालणार!
एअर इंडियाच्या हस्तांतरणानंतर टाटांच्या ताफ्यातील एकूण विमान कंपन्यांची संख्या तीन इतकी झाली आहे. त्यात विस्तारा, एअर एशिया आणि एअर इंडियाचा समावेश आहे. या कंपन्यांत संयुक्त भागीदारी करून सर्वोत्तम प्रवासी सुविधा देण्याचा टाटांचा हेतू आहे. त्यामुळे एअर एशिया आणि एअर इंडिया यांच्यात इंटरलाइन कन्सिडरेशन ऑन इरेग्युलर ऑपरेशन्स हा करार करण्यात आला आहे. या दोन्हीपैकी एखाद्या कंपनीच्या विमानाला विलंब झाला, आत्पकालीन स्थितीत ते रद्द करावे लागले, तर प्रवाशांना दुसऱ्या कंपनीच्या विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ‘टाटा’नं ‘एअर इंडिया’चा ताबा घेतल्यानंतर प्रवशांना दिलेलं हे पहिलं बंपर गिफ्ट असणार आहे. म्हणजेच आता एअर इंडियाचं तिकीट दुसऱ्या विमानातही चालणार आहे.
(हेही वाचा – ‘एस.टी’च्या इतक्या कर्मचाऱ्यांची पेन्शन लटकली!)
प्रवाशांना मिळणार दिलासा
खाद्या कंपनीच्या विमानाला विलंब झाला, आत्पकालीन स्थितीत ते रद्द करावे लागले, तर प्रवाशांना खोळंबून राहावे लागते. मात्र या निर्णयामुळे तत्काळ पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्यामुळे प्रवाशांना लेटमार्ग लागणार नाही. तसेच प्रवाशांचे समायोजन करण्यापूर्वी संबंधित विमानात किती जागा उपलब्ध आहे. याची तपासणी करून त्याआधारे विमानतळावरील कंपनी व्यवस्थापक अंतिम निर्णय घेऊ शकतात त्यामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.