‘एस.टी’च्या इतक्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन लटकले!

213

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांची कर्मचारी पेन्शन योजना १९९५ दिनांक १५ नोव्हेंबर १९९५ पासून लागू करण्यात आली आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पेन्शनचे दावे संबंधित प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधि संगठन कार्यालयाकडे महामंडळाकडून पाठवले जातात व त्याची पडताळणी करुन संबंधित कार्यालय Pension Payment Order प्रसारित करत असते.

तरीही पेंशन नाहीच

महामंडळाच्या सर्वच विभागात किमान २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत पेन्शन सुरू करण्यात आली आहे. याला अपवाद, मुंबई विभाग आहे. एस. टी. महामंडळातील सेवा निवृत्त कर्मचारी व पेन्शन अभावी दुःखद निधन झालेल्या, कर्मचाऱ्यांचे अवलंबित यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संगठन, बांद्रा, मुंबई येथिल डेक्स- ७६ (MH/16630) यांच्याकडे मुंबई विभाग यांचे व इतर विभागांना Annexure “K” नुसार माहीती न दिल्यामुळे सन २०१७ पासून अद्याप पर्यंत सुमारे २ हजार २५० कर्मचाऱ्यांचे पेन्शन दावे प्रलंबित आहेत. यापैकी ४६५ कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू होण्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी व सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयात येराझार घालत आहेत. परंतू, कर्मचाऱ्यांना pension payment order अद्यापही मिळालेले नाहीत.

( हेही वाचा: शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, धक्कादायक माहिती आली समोर! )

दावे निकाली काढावेत

सुनिल बर्थवाल, केन्दीय भविष्य निधी आयुक्त यांनी त्यांचे अर्धशासकीय पत्र क्र.pension/prayaas/2021/38755 दि.६.९.२०२१ अन्वये कर्मचारी पेन्शन योजना लागू असलेल्या, सर्व कर्मचा- यांना Pension Payment Order त्यांच्या सेवानिवृत्तीच्यादिवशी देण्याबाबत निर्देश आहेत. तरी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन दाव्याची मोठी संख्या,ऑनलाईन दावे सादर करताना, येत असलेल्या आपल्या वेबसाईटच्या अडचणी विचारात घेऊन, आपल्याकडून एक वेळचा पर्याय म्हणून विशेष मोहीम राबवून पेन्शनचे ऑफलाईन दावे निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी कर्मचा-यांकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.