कोरोनाचा असाही परिणाम, लाखो लोकांच्या सोन्याचा झाला लिलाव पण का? वाचा…

137

कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे लाखो लोकांचा रोजगार गेल्याने,लोकांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गाठीशी असलेले सोने गहाण ठेऊन, कर्ज घेतले होते. पण, हे कर्ज फेडू न शकल्याने, आता बॅंकाकडून लाखो लोकांच्या सोन्याचा लिलाव केला जाणार आहे. एनबीएफसी आणि सोन्यावर कर्ज देणा-या बॅंका बुधवारी या सोन्याचा लिलाव करणार आहेत.

कर्ज फेडण्यास असमर्थ

सोन्याच्या दागिन्यांवर किमतीच्या 70 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. यात कर्जदाराला तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यात कर्ज न दिल्यास वसुली करणे अतिशय सोपे असते. कर्जदाराचे सोने विकून कर्ज वसूल केले जाते. या महिन्यात 18 शहरांमध्ये लिलावाच्या 59 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी,2020 म्हणजेच कोविडच्या आधी, देशातील व्यावसायिक बॅंकांचा एकूण सोने कर्ज आकार 29 हजार 355 कोटी रुपये होते. त्यात अडीच पटीने वाढ होऊन दोन वर्षांत 70 हजार 871 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

असं वाढत गेलं कर्ज

  • जानेवारी 2020- 29 हजार 355 कोटी
  • 2020- 48 हजार 859 कोटी
  • डिसेंबर 2021- 70 हजार 871 कोटी

( हेही वाचा :‘एस.टी’च्या इतक्या कर्मचाऱ्यांची पेन्शन लटकली! )

या ठिकाणी होणार लिलाव

सोन्यावर घेतलेल्या या कर्जाचा लिलाव चेन्नई, बेंगळूरू, कोची, विजयवाडा, हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी बुधवारी केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.