मुंबईत ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने तिसरी लाट वेगाने पसरत असताना जवळपास सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंगचा नवव्या तुकडीचा अहवाल सोमवारी जाहीर झाला आहे. मुंबईतील १९० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्यात ९४.७४ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. नवव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २८२ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील १९० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत.
अहवालातील निष्कर्ष
- १९० कोरोना रुग्णांपैकी २३ रुग्णांचा मृत्यू ओढवला.
- १९०कोरोना रुग्णांपैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते.
- २३ मृत्यपैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
वयोगटानुसार आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण
- ० ते २० वर्षे वयोगट – १७ रुग्ण (९ टक्के)
- २१ ते ४० वर्षे वयोगट – ३६ रुग्ण (१९ टक्के)
- ४१ ते ६० वर्षे वयोगट – ४१ रूग्ण (२२ टक्के)
- ६१ ते ८० वयोगट – ७४ रुग्ण (३९ टक्के)
- ८१ ते १०० वयोगट – २२ रुग्ण (१२ टक्के)
कोरोनाच्या विषाणूंची टक्केवारीनुसार आढळलेले रुग्ण
•ओमायक्रॉन – १८० रुग्ण (९४.७४ टक्के)
•डेल्टा व्हेरिअंट – ३ रुग्ण (१.५८ टक्के)
•डेल्टा – १ रुग्ण (०.५३ टक्के)
•इतर – ६ रुग्ण (३.१६ टक्के)
१८ वर्षांखालील मुलांमधील निरीक्षण
या १९० पैकी वय वर्ष १८ वर्षांखालील ११ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. एकाला डेल्टा डेरिव्हेटीव्हची तर एकाला इतर उप प्रकाराची लागण
कोणाला रुग्णालयात दाखल करावे लागले?
१९० पैकी १०६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी,
•पहिला डोस घेतलेले ५ जण रुग्णालयात दाखल.
•दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५० जण रुग्णालयात दाखल.
•लसीचा एकही डोस न घेतलेले ५१ जण रुग्णालयात दाखल.
•रुग्णालयात दाखल १०६ पैकी फक्त ९ जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तर ११ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली.