रशिया आणि युक्रेनवर युद्धाचे ढग जमू लागले आहेत. पुढील ४८ तासांत रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकेल या भीतीने अमेरिकेने १४ फेब्रुवारीला युक्रेनची राजधानी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद केले आणि पोलिश सीमेजवळील ल्विव्ह येथे सैन्य तैनात केले आहे. रशियाने सुद्धा मोठ्या प्रमाणात रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि सैनिक तैनात केले आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषत: विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सध्या २० हजारांहून अधिक भारतीय आहेत. अमेरिकेने याआधी रशियाला युद्ध न करण्याचा इशारा दिला होता.
युद्धाचे ढग
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या कार्यालयाने म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे, यावर अमेरिकेचा अजूनही विश्वास बसत नाही आहे. मुत्सद्देगिरीने युद्ध टाळणे हा एकमेव मार्ग आहे. तर, रशिया आता दखल न घेता प्रभावीपणे हल्ला करू शकतो. असे ब्रिटनचे संरक्षण सचिव जेम्स हिप्पी यांनी स्पष्ट केले.
सध्य स्थितीत यूक्रेनच्या बॉर्डरवर रशियाने १ लाख ३० हजार सैन्य तैनात केले आहे. यात जवान, वैमानिक, नौसैनिकांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारीला म्हणजेच पुढच्या काही तासात यूक्रेनवर हल्ला केला जाऊ शकतो अशी शंका अमेरीकेने व्यक्त केलीय.
(हेही वाचा ‘वागीर’ स्कॉर्पिन पाणबुडीची पहिली सागरी चाचणी यशस्वी)
वैचारिक जवळीक
लष्करी कारवाई आता कोणत्याही दिवशी होऊ शकते. असे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे चेतावणीशिवाय हल्ला करु शकतात असेही जॉन किर्बी म्हणाले. रशिया आणि चीनसारख्या देशांविरुद्ध नाटो संस्थेतील काही देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे चीनचे मत आहे. स्टॅलिन आणि माओ यांच्या काळापासून रशिया आणि चीन यांच्यात वैचारिक जवळीक असल्याचेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच रशिया आणि चीन या दोन्ही देशांचा पाश्चिमात्य देशांशी तणाव आहे.
Join Our WhatsApp Community