ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर शुध्दीकरण केंद्रामधील एच.टी सबस्टेशन तसेच शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे.
‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद
या शटडाऊनमुळे बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९. ०० वाजेपर्यंत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, ईटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत व आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री ९ .०० ते गुरुवार सकाळी ९.०० वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
(हेही वाचा – ‘बेस्ट’ झाले! तिसऱ्या लाटेत बाधित झालेले २५० कर्मचारी कोरोनामुक्त)
एक-दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community