चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, वाचा काय आहे प्रकरण

-आगामी 21 फेब्रुवारीला सुनावणी शिक्षा

151

चारा घोटाळ्यातील दोरांडा कोषागार प्रकरणी रांचीच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांनी दोषी ठरवले आहे. तर 24 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. 1996 सालापासून सुरू असलेल्या या खटल्याचा तब्बल 26 वर्षानंतर निकाल लागला आहे. आगामी 21 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे.

सुमारे 950 कोटी रुपयांचा हा घोटाळा लालूंसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. आतापर्यंत या घोटाळ्याशी संबंधित 5 प्रकारणांमधील 4 प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण 1996 साली समोर आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर लालू यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तसेच 1970 साली बिहारचे मुख्यमंत्री असलेले जगन्नाथ मिश्रा यांच्यावरही या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप लावण्यात आला होता.

घोटाळ्याचा घटनाक्रम

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवण्यात आले. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाईसाठी 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली. तर 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली आणि 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यांची सुटका झाली. त्यानंतर 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली. मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात 2013 मध्ये त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणणारे सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत.

(हेही वाचा – ३६ तासांपासून भुकेल्या बिबट्याचे तोंड अडकले पाण्याच्या रिकाम्या बाटलीत!)

दोरांडा प्रकरण

दोरंडा कोषागारातून 1990 ते 1995 साला दरम्यान बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोळयातील सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. याप्रकरणातील एकूण 99 आरोपींवर अद्यापही निर्णय येणे बाकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.