महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांसोबत बिहारमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वाघांच्या मागणीवर चर्चा झाली असून तसे पत्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विभागाला पाठविले आहे.
वाघाची मागणी
राज्यात ३४० ते ३५० पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यापैकी सुमारे २०० पेक्षा अधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. चार वर्षांनी होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना सध्या केली जात आहे. त्याचे कामही युद्धपातळीवर सुरु असून महाराष्ट्रात वाघांची संख्या आणखी वाढू शकते. ही स्थिती लक्षात घेऊनच अन्य राज्यांनी महाराष्ट्राकडे वाघांची मागणी केली आहे. त्यामध्ये बिहार सरकारचा समावेश आहे. बिहारमधील वनाधिकारी आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांचे स्थलांतर करण्याचा विचार करण्यात आला. बिहार सरकारने महाराष्ट्रातील वन्यजीव विभागाकडे पत्र पाठविले आहे. त्यात वाघाची मागणी केलेली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
( हेही वाचा : वाघांमध्ये गॅंगवॉर? त्यानंतर काय घडले…वाचा.. )
देशात २०२१ मध्ये एकूण १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली, गेल्या दहा वर्षातील हा आकडा सर्वाधिक तसेच धक्कादायक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून या वर्षी 29 डिसेंबरपर्यंत वाघांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. यामुळेच प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community