भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी असलेल्या कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेससह काही महत्वाच्या रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील चाकरमान्यांचे हाल होऊ लागले आहेत. बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी चाकरमान्यांनी केली आहे.
सह्याद्री एक्सप्रेस मार्च 2020 पासून बंद केलेली
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार फक्त हंगामामध्ये फुल्ल आणि इतर वेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी कोरोनाच्या साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे ही बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
(हेही वाचा शिवसेना भवन झाले ‘कोरोना मुक्त’?)
Join Our WhatsApp Community