राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाची काय आहे सद्यस्थिती?

95

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात कोरोना विषाणूची आलेली तिसरी लाट ओसरल्याची आनंदवार्ता राज्याच्या आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून जनुकीय अहवालांच्या चाचणीत ओमायक्रॉन तपासणी पॉझिटीव्ह येत असली तरीही तिसऱ्या लाटेतील सर्वच रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत.

सर्वच कोरोनाबाधितांची ओमायक्रॉनच्या तपासणीसाठीची जनुकीय तपासणी झाली नाही, त्यामुळे ओमायक्रॉनच्या केसेसचा खरा आकडा समजायला मर्यादा आल्या, अशी माहितीही डॉ. आवटे यांनी दिली. त्यामुळे राज्यात तपासणीतून दिसून येणा-या ओमायक्रॉनच्या केसेसची ही आकडेवारी नेमकी म्हणता येणार नाही, असेही डॉ. आवटे म्हणाले.

(हेही वाचा ३६ तासांपासून भुकेल्या बिबट्याचे तोंड अडकले पाण्याच्या रिकाम्या बाटलीत!)

तिस-या लाटेच्या आगमनानंतर आतापर्यंत सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण मंगळवारी आढळून आले. मंगळवारी ३५१ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली. सर्वात जास्त रुग्ण औरंगाबादमध्ये दिसले, औरंगाबादमध्ये १४८, तर नाशकात १११, ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पुणे शहरात ७२, पुणे ग्रामीणमध्ये १२, यवतमाळमध्ये २ तर साता-यात एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला.

  • राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची नोंद – २ हजार ८३१
  • राज्यात गेल्या २४ तासांत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – ८ हजार ६९५
  • राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९७.७३ टक्के
  • राज्यात गेल्या २४ तासांत मृत्यू पावलेले रुग्ण – ३५
  • राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या – ३० हजार ५४७
  • राज्यातील सक्रीय ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या – १ हजार ११
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.