खुल्या बाजारात फेरीवाल्याचा व्यवसाय करणा-या अमरावतीतील एका भाजी विक्रेत्याने चक्क आपल्या स्टॉलवर भजीसह कामोत्तजनेच्या गोळ्याही विक्रीला ठेवल्या. आपला व्यवसाय तेजीत वाढवण्याची त्याची शक्कल एके दिवशी त्यालाच भारी पडली आणि अन्न व औषध प्रशासनानेच त्याच्या स़्टॉलवर धाड टाकली. या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास जीवघेण्याही ठरु शकतात.
काही औषधे डॉक्टरांच्या सूचनेनेनुसार वापरता येतात. डॉक्टरांचे प्रिस्किप्रशनशिवाय थेट खुल्या बाजारात कामोत्तजनेच्या गोळ्या खरेदी करता येत नाही. अशाच एका दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी धाड टाकून विग्रोमॅन १०० या गोळ्यांची अवैध खरेदी रोखली होती. या गोळ्यांमध्ये स्लायडेनाराफिल सिट्रेट या घटकाचा समावेश असतो. ही गोळी थेट विकता येत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सुरु ठेवलेल्या चौकशीतून अमरावतीत थेट भाजी विक्रेता हे औषध स्टॉलवर विकत असल्याचे समजले.
अधिकारीच बनले बनावट ग्राहक
१२ फेब्रुवारीला अमरावतीतील जयस्तंभ चौकातील जय अंबे ब्रेड पकोडा सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीच बनावट ग्राहक बनून गेले. कामोत्तेजनाच्या गोळ्या सागर नंदकिशोर साहू विकत होता. गोळ्या विकतानाच अधिका-यांनी त्याला रंगेहाथ पकडले. या गोळ्यांची खुल्या बाजारात विक्री करता येत नाही. कामोत्तेजनाच्या ५० ग्रॅमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिल्या जातात. अन्यथा शरीरावर उलट परिणाम दिसतो. या गोळ्यांसह दारूच्या सेवनाने जीव गमावल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. लोकांनी बेकायदेशीर मार्गाने औषध खरेदी करु नये, असे अन्न व औषध प्रशासनातील औषध विभाग, सहाय्यक आयुक्त, डी.आर.गहाणे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – गायक, संगीतकार ‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी यांचं निधन)
औषधं भाजी विक्रेत्याकडे आली कुठून
बाजारातील मूळ किंमतीपेक्षाही कमी किंमतीत सागर साहू दुकानातील ग्राहकांना कामोत्तजनेच्या गोळ्या देत होता. ही गैरमार्गाने औषध विकणा-यांची मोठी साखळी असावी. औषधांचा साठा त्यांना उपलब्ध कसा होतो, याचा शोध सध्या सुरु आहे.
Join Our WhatsApp Community