मंगळवारी शिवसेना नेत आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे तिघे राऊतांच्या निशाण्यावर होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, माजी आमदार किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक उत्तर दिले. या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राऊत यांनी ट्विटरवरुन एक सूचक ट्वीट करत पुन्हा एकदा सोमय्या पिता-पुत्रांना टार्गेट केले आहे.
असं केलं राऊतांनी ट्वीट
दरम्यान संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी एक नवं ट्वीट केले असून या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र! त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर कारवाई केली जाईल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट की मराठी हृदयसम्राट? मनसेच्या निवेदनात झाला खुलासा )
संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. हे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या याच्या संदर्भात आहे की अन्य दुसऱ्या कोणाबद्दल ? आता असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
काय केला राऊतांनी सोमय्यांवर आरोप
किरीट सोमय्या यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या सगळ्याची कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध तपासाला सुरुवात होणार का? पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान याच्यासोबत किरीट सोमय्या यांचा मुलगा निल किरीट सोमय्याची भागिदारी असल्याचा आरोप केला होता. पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा हा निल सोमय्यांच्या व्यवसायात वापरला असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community