अंतिम वर्षाची परीक्षा घरी बसून देण्यास राज्यपालांची मंजूरी, निकाल ३१ ऑक्टोबरला लागण्याची शक्यता

186

राज्यातील विद्यापीठ स्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरी दिल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असे उदय सामंत यांनी सांगितले असून, महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

oie 3182416UWQbuR8X

राज्यपालांसोबत बैठक

राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजूरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून, त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू,” असे उदय सामंत यांनी सांगितले.

युजीसीकडे भूमिका मांडणार

सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेणार असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू,” असे उदय सामंत यांनी सांगितले आहे. १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून, तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा गेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून कुलपती या नात्याने राज्यपालांनीही त्याच सूचना केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. परीक्षेच्या तारखा संबंधित विद्यापीठं अंतिम करणार आहेत. पण सध्या ज्या तारखा ठरवत आहोत त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील अशीच शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे.

उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.