राज्यात विविध ठिकाणी मराठी दिनानिमित्त कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. रत्नागिरी पंचायत समिती, कोकण मराठी साहित्य परिषदेची मालुगंड शाखा आणि कवी केशवसुत स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी याच संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी राजभाषा दिन’ हा कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने यावर्षीसुद्धा खुल्या गटासाठी रत्नागिरी तालुका मर्यादित खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्र पुरवणार ‘वाघ’! )
स्पर्धेसाठी पुढील विषय देण्यात आले आहेत
१. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि समाजव्यवस्थेतील वास्तव दर्शन
२. मराठी शिक्षणाचे माध्यम : वास्तव आणि भवितव्य
३. शांताबाई शेळके यांच्या कविता आणि भावविश्व
( हेही वाचा : यंदा तुम्हीही सिनेमाला मिळवून देऊ शकता ‘ऑस्कर’ )
अटी व नियम
लेखनाची शब्दमर्यादा १५०० आहे. स्पर्धकाने आपले निबंध २० फेब्रुवारीपर्यंत कवी केशवसुत स्मारक, मालगुंड, ता. जि. रत्नागिरी या पत्त्यावर पोहोच करावयाचे आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३०, ८८८८०३३६२१ किंवा ९१७५५२६६६० या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community