शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले, भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर घणाघाती हल्ला केला. त्यानंतर लागलीच सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्हिडिओ दाखवून राणेंचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला.
सोमय्यांनी राणेंवर केलेले आरोप
एकेकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता, त्या आरोपांना घाबरुनच राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला. यावेळी विनायक राऊत यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडी चौकशीला घाबरूनच नारायण राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसऱ्या एका व्हिडिओत नरेंद्र मोदी हे एनडीएचे खोटारडा उमेदवार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केल्याचे दिसत आहे.
(हेही वाचा कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड : ७ वर्षे झाली तरीही तपास सुरूच! काय आहे गौडबंगाल?)
नितेश राणेंनी सोमय्यांवर केलेले आरोप
शिवसेनेने दुसरा एक व्हिडिओ दाखवला असून त्यामध्ये नितेश राणे हे किरीट सोमय्यांवर आरोप करताना दिसत आहेत. यात नितेश राणे म्हणतात, किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात आहेत. मुंबईच्या शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला त्यांनी विरोध केला होता. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी साऊथ मुंबई ही शाकाहारी विभाग म्हणून जाहीर करा, अशी मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नितेश राणेंनी आरएसएसवर आरोप केला होता, असेही विनायक राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community