शिवसेना नेते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी एका बाजूला परस्पर विरोधात पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्याचबरोबर आता ट्विटरवरूनही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
राणे-नार्वेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोप
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ‘कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो, माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर, काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी खिल्ली उडवली होती.’
त्यावर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर देत ‘बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
त्याला नारायण राणे यांनी ट्विटद्वारेच प्रत्युत्तर देत ‘सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका’, असे म्हणाले.
Join Our WhatsApp Communityसुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.@NarvekarMilind_
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 16, 2022