मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात बसवलेल्या एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या ५ हजार ३५० वरून १० हजार होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण शहरात ५ हजार ५३० कॅमेरे उभारण्यात येणार असून, येत्या काही महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होतील. मात्र, मुंबईतील किती पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही.
लवकरच निविदा काढणार
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ हजार ५३० कॅमेरे बसवायचे आहेत. दोन ते तीन महिन्यांत हे नवीन कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी निविदा काढल्या जातील. यापूर्वी मुंबईत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांची गुन्ह्याचा आणि गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांना खूप मदत होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
(हेही वाचाः डी कंपनीला ईडीचा दुसरा धक्का, इकबाल कासकरचा घेणार ताबा)
कशी आहे गुन्ह्यांची संख्या?
वार्षिक अहवाल सादर करताना मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, २०२१ मध्ये शहरातील पोलिस ठाण्यांत ६७ टक्के तपास दरांसह ३३ हजार ८१३ गुन्हे नोंदवले गेले. २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये २७ हजार २४४ अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती, त्यांचा तपासाचा दर ६२ टक्के होता. मागील वर्षी साथीच्या आजारामुळे कमी लोक रस्त्यावर आल्याने या वर्षी संख्या वाढली असल्याची माहिती नगराळे यांनी दिली होती.
चोरीची इतकी प्रकरणे
२०२१ मध्ये चोरी, मोटार वाहन चोरी आणि दुखापत (शारीरिक दुखापत) हे सर्वोच्च गुन्हे नोंदवले गेले. मागील वर्षात वाहतुकीच्या उल्लंघनाचा विचार केला असता, हेल्मेटशिवाय वाहन चालवण्याची ८.०६ लाख प्रकरणे आणि नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवण्याची ६.६३ लाख प्रकरणे होती.
(हेही वाचाः बापरे! पतीने सोफा उघडला अन् दिसला पत्नीचा मृतदेह)
पोलिस भरतीबाबत काय म्हणाले नगराळे?
पोलिसांची एकूण मंजूर संख्या ४६ हजार २१२ असून, मुंबई पोलिस दलामध्ये अजूनही ८ हजार ७४७ पदे रिक्त आहेत. यामागील कारण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून पोलिस भरती होऊ शकली नाही. अलीकडेच आम्ही दलात १ हजार ७६ पोलिस शिपायांची भरती केली, जी २०१८ मध्ये व्हायला हवी होती, अशी माहिती नगराळे यांनी दिली. नगराळे पुढे म्हणाले की, या वर्षी पोलिस कल्याणाचा एक भाग म्हणून, त्यांनी प्रथमच प्रत्येकाला ७५० रुपयांची दिवाळी भेट दिली, त्याचा लाभ ३० हजार ९७४ हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
पोलिस कर्मचार्यांवर केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नागराळे म्हणाले की, २०२१ मध्ये विभागीय चौकशीनंतर ३२ कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आणि ३३ जणांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले. गेल्या वर्षी सेवेतून काढून टाकलेल्यांमध्ये सचिन वाळे, सुनील माने आणि रियाजुद्दीन काझी यांचा समावेश आहे.
(हेही वाचाः मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर! काय आहे विशेष कारण वाचा…)
Join Our WhatsApp Community