बुधवारी राज्यात २ हजार ७४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. बुधवारी ५ हजार ८०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता राज्यात केवळ २७ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु होते. राज्यात ४१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात १११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांचा चाचणी अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला.
बुधवारी जिल्हानिहाय आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण
- अहमदनगर-२१,
- नवी मुंबई-१९,
- जालना व यवतमाळ- प्रत्येकी १५,
- औरंगाबाद -१०,
- नागपूर व मुंबई प्रत्येकी ९,
- ठाणे मनपा-६,
- मीरा भाईंदर मनपा व सातारा प्रत्येकी-३,
- लातूर-१
(हेही वाचा – …तर तीव्र आंदोलन करणार, एसटी कर्मचा-यांचा इशारा)
-
महत्वाचे…
👉 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ % एवढे झाले आहे
👉आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६७,५७,२३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५०,४९४ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
👉सध्या राज्यात २,७९,७४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,१६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.