सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘आसाम वैभव’ने सन्मानित करण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. गुवाहाटी येथे आयोजित सोहळ्यात 24 जानेवारी रोजी टाटांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार होता. परंतु, काही वैयक्तिक कारणांमुळे टाटा त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नव्हते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील 19 लोकांची निवड
आसाम सरकारने आपल्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 19 लोकांची निवड केली होती. यामध्ये कोरोनाकाळातील फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबतच उद्योजक देखील सामील होते. रतन टाटांसह आणखी 5 जणांना ‘आसाम सौरव’ आणि 12 जणांना ‘आसाम गौरव’ने सन्मानित करण्यात आले.
(हेही वाचा – राज्यातील पाच ऑलिव्ह रिडले कासवांचा भ्रमंती मार्ग कसा शोधणार? जाणून घ्या… )
या पुरस्काराशी निगडीत नियमांनुसार, हा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव प्रत्येक वर्षी केवळ एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे. तर आसाम सौरव 3 लोकांना दिला जाईल तर आसाम गौरव 15 लोकांना दिला जाणार आहे. या प्रकारे एकूण 19 लोकांना हे पुरस्कार दिले जातील. मात्र, प्रत्येक वर्षी काही कारणास्तव यामध्ये थोडा बदल झालेला दिसून येतो. पुढील वर्षी लोकांच्या शिफारसीनुसार हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून लवकरच सरकार त्यासाठी एका पोर्टलची सुरुवात करणार आहे.
Join Our WhatsApp Community