गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. बुधवारी राऊत यांनी सोमय्यांनी ईडीच्या नावाने धमकी देऊन एका जमीन मालकाकडून 100 कोटींचा फ्लॅट मातीमोल भावात बिल्डर मित्र अमित देसाईच्या नावावर केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज राऊत यांनी सोमय्यांवर नवा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाहांच्या नावाने धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. .
काय म्हणाले राऊत
सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली 300 ते 400 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार नोंद करणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले
सोमय्या स्वतःच्या हातातली चप्पल घेऊन स्वतःलाच मारतील
‘एकेदिवशी किरीट सोमय्या स्वतःच्या हातातली चप्पल घेऊन स्वतःलाच मारतील आणि महाराष्ट्रातील लोकं त्यांची एक दिवस कपडे काढून धिंड काढतील,’ असे म्हणत राऊतांनी सोमय्यांचा नवा घोटाळा आज समोर आणला. पवईतील पेरुबाग पासपोली येथे जवळपास 138 एकरचा भूखंड आहे. या ठिकाणी पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना सोमय्यांनी घुसवले आहे. त्यांचा यावर अधिकार नाही. पण किरीट सोमय्यांच्या एजंटीने बाहेरील 433 लोकांना घुसवले. आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याच्या पेपरवर सही केली. या 433 लोकांकडून एजंटच्या मार्फत सोमय्यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये घेतले. हा 200 ते 300 कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. यामध्ये फडणवीसांना पैसे द्यायचे सांगून सोमय्यांनी वसूली केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
(हेही वाचा – …तर ‘ती’ पत्नी ठरेल पेन्शनसाठी अपात्र!)
बेगाने शादी में नाचू नये
किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला जात असून त्यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार आहे, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community