“… म्हणून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल”

122

उद्या 18 फेब्रुवारी रोजी भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावाला भेट देणार आहेत. तसेच कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर असलेल्या 19 बंगल्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोर्लईत पाहणीसाठी सोमय्यांचा दौरा शुक्रवारी असून त्यापूर्वी मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ भागात असलेल्या बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. ठाकरे सरकार आणि पोलिसांनी माझ्याविरूद्ध आणखी एक नोटीस पाठवली असून भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विट करत दिली आहे.

काय केले सोमय्यांनी ट्वीट

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रापर्टीची पाहणी केल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसमध्ये कलम १८८ अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांना यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी सोमय्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

ठाकरे सरकार/पोलीसची माझ्याविरुद्ध आणखी एक नोटीस. छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील ‘बेनामी प्रॉपर्टी’ ९ मजली बंगल्याची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल

(हेही वाचा – लोक सोमय्यांची धिंड काढतील! असं का म्हणाले राऊत)

सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्रं लिहिले आणि लिहून माझ्या नावावर बंगले करा असे सांगितले होते. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केले. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल करतानाच मला चप्पलेने मारणार ते ठिक आहे. पण हरवलेल्या 19 बंगल्यावर बोला. त्याचे उत्तर द्या, असे आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.