भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गुरुवारी पत्रकार परिषद घेत, राऊतांच्या आरोपांवर उत्तर तर दिलेच पण ठाकरे सरकारवर निशाणाही साधला आहे. राऊत हे वैफल्याग्रस्त झाले आहेत. राऊतांना ईडीने बोलावलं होतं, हिंमत होती तर का गेले नाही. राऊतांनी 19 बंगल्यांचं प्रकरण रश्मी ठाकरेंच्या भावावर ढकललं. हे 19 बंगले रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने केले गेले. मला माहितीच्या अधिकारात मिळालेले कागदपत्र देतो, उद्धव ठाकरेंच्या उद्धट सेनेची उद्धटगिरी बघा. काही लोकांनी सरपंचाची मुलाखत व्हायरल केली, महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या समोर हसं करुन घेऊ नका. सरपंचांनी मे 2019 मध्ये 19 घरं नावे केली, माझा वाद सरपंचाशी नाही. मुख्यमंत्र्यांशी आहे. उद्धव ठाकरेंचा घोटाळा उघड केला तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स भरला गेला. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हे माझ वाक्य नाही, संस्कृती नाही. असं म्हणत किरिट सोमय्या यांनी राऊतांवर तोफ डागली.
पुराव्याशिवाय मी बोलत नाही
मुख्यमंत्री आहेत म्हणून मी थांबलो होतो, रश्मी वहिनाींच्या नावे जागा असल्याने थांबलो होतो. पण संजय राऊत यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. सनम हम तो डुबेंगे, ठाकरे साहब तुमकोही लेके डुबेंगे, असं राऊतांना म्हणायचं आहे हे दिसतंय. पाटणकर बोलत नाहीत. रश्मी वहिनी बोलत नाहीत. राऊतांना बोलायची गरज काय होती? संजय राऊत मी डॉक्युमेंटशिवाय एक शब्द बोलत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
( हेही वाचा: आता मध्य रेल्वे धावणार सुसाट! पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण! )
…मग मला विचारु नका
संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, कुठल्याही व्यक्तीने आरोप केले आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर मला याबाबत काही विचारू नका असे सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत हे कुठलेही आरोप करत असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community