पुणे शहर पोलिसांच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात आयपीसी कलम 376 आणि 313 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | FIR registered against Shiv Sena Deputy leader Raghunath Kuchik under IPC Sec 376 and 313 in Shivajinagar Police Station of Pune City Police. FIR registered after a complaint of rape and forceful abortion received last night at the Polie Station.
— ANI (@ANI) February 17, 2022
कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तरुणीने कुचिकविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचिकने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केला, असा आरोप महिलेने केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप या तरुणीने तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – लोक सोमय्यांची धिंड काढतील! असं का म्हणाले राऊत)
काय घडला प्रकार
पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे. हा प्रकार 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिर्यादीने, माझ्यावर शारीरिक संबंध बनवून माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भादंवि 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहे.
Join Our WhatsApp Community