शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वादळाने चांगलाच जोर धरला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना देखील मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी तिखट शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
हिंमत असेल तर राज्यपालांना पत्र पाठवून बलात्कार पीडितांची थट्टा करणा-या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि पोलिस यंत्रणेवर टीका केली आहे.
(हेही वाचाः शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल!)
चित्रा वाघ यांना समन्स
मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 37(1) व 135 महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे आरोपपत्र सादर करण्यासाठी चित्रा वाघ यांना 21 फेब्रुवारी रोज सकाळी 11 वाजता किल्ला न्यायालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरुन चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
वा रे बहाद्दर @MumbaiPolice …
भाजपा नेते कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापुरतीचं तुमची बहाद्दरी शिल्लक राहीलीये…
हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली….
षंढ सरकारची षंढ यंत्रणा pic.twitter.com/JcJBv3OIFi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2022
(हेही वाचाः “… म्हणून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल”)
षंढ सरकारची षंढ यंत्रणा
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत मुंबई पोलिस आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वा रे बहाद्दर… भाजपा नेते कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापुरतीचं तुमची बहाद्दरी शिल्लक राहिली आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपीडितांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली. षंढ सरकारची षंढ यंत्रणा, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं आहे.
Join Our WhatsApp Community