‘हा’ नक्षलग्रस्त जिल्हा होणार मोतीबिंदू मुक्त! 150 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

104

रोटरी क्लब ऑफ मुंबई, वर्धा, नागपूर दक्षिण पूर्व, पोलिस विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माऊली मित्र सेवा मंडळ यांच्या वतीने, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे 150 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाली. ऑपरेशन रोशनी अंतर्गत या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व संस्थांचे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय आहे.

ऑपरेशन रोशनी अंतर्गत गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील 41 वृद्ध महिला आणि पुरुषांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपक्रमाचा अतिदुर्गम भागातून आलेल्या नागरिकांनी लाभ घेतला. यामुळे अनेकांना नवी दृष्टी मिळाली. या उपक्रमासाठी मुंबई रोटरीचे गुप्ता व माजी पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

मोतीबिंदू मुक्त

गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे मोतीबिंदू मुक्त व्हावा हे पोलिस विभागाचे उद्दिष्ट आहे, असे सुहास खरे यांनी स्पष्ट केले आहे. नेत्ररोग, नियमित नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया याविषयी जागरूकता पसरवून ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचणे. तसेच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध नसणे, आव्हानांना तोंड देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मोतीबिंदूमुळे होणाऱ्या अंधत्वाचे जागतिक ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक अंधत्व दूर करणे हे ध्येय आहे. गडचिरोली पोलिस विभाग आणि अहेरीच्या कर्मचाऱ्यांनी नेत्र तपासणी शिबिरात सर्व व्यवस्था केली, तसेच हा नक्षलग्रस्त विभाग असल्यामुळे अहेरी ते सावंगी मेघे रूग्णालय हा प्रवास पूर्णपणे पोलिसांच्या सुरक्षेत होतो, असेही खरे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.